
त्या पैशातून सदावर्ते यांनी कोणती मालमत्ता खरेदी केली याचा शोध पोलिस घेत आहेत.
सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ, घरात सापडली पैसे मोजण्याची मशीन
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सध्या वकील गुणरत्न सदावर्ते हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावर न्यायालयात सुनावणी झाली आहे. सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातूनही त्यांच्यावर नवनवीन गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. एसटी कामगारांकडून २ कोटींहून अधिक रकम वसूल करण्याचा गंभीर गुन्हा सदावर्ते यांच्यावर दाखल झाला आहे. त्या पैशातून सदावर्ते यांनी कोणती मालमत्ता खरेदी केली याचा शोध पोलिस घेत आहेत. ही माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात दिली. त्यामुळे सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा: सीतारामन यांची CFLI च्या उपाध्यक्षांसोबत भेट, महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
याशिवाय सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन सापडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. न्यायालयात सरकारी वकील घरत यांनी सदावर्ते पोलीस चौकशीत सहकार्य करत नाही, ते स्वतःचा मोबाईल द्यायला तयार नाहीत, असेही म्हटले आहे. दरम्यान, गावदेवी पोलिसांनी या गुन्ह्यात मनोज मुदलियार या आरोपीला अटक केली आहे. मनोज याच्या अटकेमुळे या गुन्ह्यात अटक आरोपींची संख्या ११८ वर गेली आहे. आंदोलनापू्र्वी सिल्व्हर ओक बंगल्याची रेकी केल्याचा आरोप मनोजवर आहे.
सदावर्ते सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात नसले तरी एसटी कर्मचारी आंदोलन आणि त्याच्या कटाबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी तपासामध्ये पुढे आलेल्या बाबी न्यायालयासमोर मांडल्या. यामध्ये त्यांनी सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर येथील घरातून पैसे मोजण्याचे मशीन जप्त केल्याची माहिती दिली. तसेच सदावर्ते यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपकाळात नवीन गाडी, काही मालमत्ता खरेदी केल्याचे समजत असून ही खरेदी कोणत्या पैशातून करण्यात आली याची पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: राऊतांना न्यायव्यवस्थेवरील टीका भोवणार? बार असोसिएशनची अवमान याचिका
Web Title: Gunratna Sadavarte Home Found Calculation Of Money Machine And Bought Properties
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..