नवाब मलिकांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करणार - हाजी अराफत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

नवाब मलिकांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करणार - हाजी अराफत

राज्यात गेल्या काही दिवासांपासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बनावट नोटांचा खेळ केल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी हाजी अराफत शेख यांच्या भावावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यावरून भाजपनेते हाजी अराफत यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप करत आहेत, मात्र त्यानी केलेल्या सर्व भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण उघड करणार असल्याचं शेख यांनी यावेळी सांगितलं. हाजी अराफत शेख यांनी नवाब मलिकांवर आरोप करताना वक्फ बोर्डाच्या कामांवरून गंभीर आरोप केले.पुण्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराशी संबंधीत काही लोकांवर तसेच संस्थांवर ईडीने कारवाई केली. त्यावरून नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ईडीवर कारवाई न झाल्याचे सांगत वक्फ बोर्डाच्या कामांबद्दल माहिती दिली होती.

हेही वाचा: कामावर परत या! विलीनीकरण एक-दोन दिवसांत शक्य नसल्याचं परबांंचं विधान

नवाब मलिक यांच्यावर टीका करताना, एक भ्रष्ट मंत्री अल्पसंख्यांक लोकांचे मुद्दे सोडून आपल्या जावयाचं दुख मनवता आहेत असा आरोप त्यांनी केला. नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांची देखील पोल खोल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नवाब मलिकांवर उपचार करा असं आवाहन त्यांनी कुटुंबीयांना केलं.

हेही वाचा: हिंदू धर्म आणि हिंदुत्वामध्ये अंतर; राहुल गांधींनी सांगितला काय आहे भेद

वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळा प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर आरोप करताना, एक निवृत्त अधिकारी अनिस शेख यांना मंत्रालयाच्या परवानगी शिवाय पदावर बसवलं, स्वार्थासाठी त्यांची नियुक्ती केली असा आरोप त्यांनी केला. मुंब्र्यातील एका मस्जित प्रकरणात नवाब मलिक यांनी ९ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच नवाब मलिकांनी शाहरुख खानचा प्रवक्ता म्हणून काम केल्याचा आरोप देखील त्यांनी आरोप केला.

loading image
go to top