
हिंदूंसाठी मटणाला मल्हार सर्टिफिकेशन आणणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. ज्या दुकानात मल्हार सर्टिफिकेशन असेल तिथंच मटण खरेदी करा असं आवाहन त्यांनी केलंय. सोशल मीडिया अकाउंटवर नितेश राणेयांनी याबाबत पोस्ट केलीय. मल्हार सर्टिफिकेशनसाठी साइटही सुरू करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिलीय. यानंतर हलाल मटण आणि झटका मटण याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झालीय.