शिष्यवृत्ती देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्यावर 

Half of the number of students giving scholarships
Half of the number of students giving scholarships

शिरोली पुलाची : पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा परिणाम विद्यार्थिसंख्येवर झाल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. 

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील राज्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे प्रमाण शंभरच्या आत आलेले असताना, आता राज्य सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. राज्य सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते. आधी ही परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती; मात्र 2016 मध्ये या निर्णयात बदल करण्यात आला. 2017 पासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. चौथी आणि सातवीसाठी परीक्षा घेतली जात असताना, 16 लाखांच्या वर विद्यार्थी परीक्षा देत होते; मात्र पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा सुरू झाल्यापासून 10 लाखांपेक्षाही कमी विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामुळे सहा लाख विद्यार्थी कोठे गेले, असा सवाल उपस्थित होत आहे. 

पाचवी आणि आठवीचे वर्ग खासगी शाळांना जोडलेले आहेत. तेथे शिष्यवृत्ती परीक्षेची सक्ती केली जात नाही. याउलट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची सक्ती केली जात होती. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संख्येवर झाला आहे. 
-डॉ. आय. सी. शेख, 
प्राचार्य, डाएट कॉलेज कोल्हापूर. 

दृष्टिक्षेप 
2014 
चौथी : 8 लाख 90 हजार 739 
सातवी : 6 लाख 78 हजार 786 
2015 
चौथी : 9 लाख 90 हजार 739 
सातवी : 6 लाख 78 हजार 786 
2016 परीक्षा झाली नाही. 
2017 
पाचवी : 5 लाख 45 हजार 940 
आठवी : 4 लाख 03 हजार 359 
2018 
पाचवी : 4 लाख 88 हजार 470 
आठवी : 3 लाख 69 हजार 995. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com