पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे: "आज, ८ नोव्हेंबर, एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आदरणीय लालकृष्ण अडवाणी जी त्यांच्या आयुष्याच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष प्रसंगी, त्यांना माझ्या शुभेच्छा! मी एक लेख लिहिला आहे, ज्यामध्ये मी भारतासाठी दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला आहे. मी त्यांच्या जीवनप्रवासाच्या विविध टप्प्यांचे स्मरण केले आहे—मग ती फाळणीची भीषणता अनुभवून शून्यातून पुन्हा आयुष्य उभे करण्याची गोष्ट असो, जनसंघाला बळकट करणे आणि भाजपची उभारणी करणे असो, आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहणे असो, सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेचे नेतृत्व करणे असो किंवा सरकारमध्ये राहून राष्ट्राची सेवा करणे असो.