esakal | Happy Valentines Day : रोहित पवार अन् चर्चा फक्त 'त्या' मेसेजचीच
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-2.gif

Happy Valentines Day : रोहित पवार अन् चर्चा फक्त 'त्या' मेसेजचीच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : आज सगळीकडे Valentine Day मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेकजण आज आपल्या प्रेमाची कबुली देतात. हा दिवस राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही एका खास पद्धतीने साजरा केला आहे. रोहित पवारांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत एक हटके ट्वीट केलं आहे, त्याचीच सध्या मोठी चर्चा आहे. 

'हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे' असं म्हणत त्यांनी ट्वीटची सुरुवात केली, पण त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला चांगलाच टोला लगावला आहे.

आजच्या प्रेमाच्या दिवशी सगळेजण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आवडत्या गोष्टी करतं. पण तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या... गॅसचा दर 910 रुपये प्रती सिलिंडर झाला आहे असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय लिहलं आहे ट्वीटमध्ये...

'हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे! हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या... गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.'

खरंतर गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

#PulwamaAttack 'पुलवामा नहीं भूलेंगे...'; हुतात्म्यांना देशभरातून श्रद्धांजली

महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस किमती या 145 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना 829.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर, दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या 881 रुपये झाल्या आहेत.