तुमच्या जागा, जमिनीवर कोणी अतिक्रमण केलयं का? घाबरू नका, ‘येथे’ दावा दाखल केल्यास मिळेल हमखास न्याय; ‘या’ गोष्टी पाळा, अतिक्रमण होणारच नाही

जमिनीची मालकी एका व्यक्तीकडे असते, पण दुसरा व्यक्ती हेतुपुरस्सर त्या जमिनीवर अतिक्रमण करताना दिसून येतो. त्या जमिनीवर मालकीचा दावा सांगतो. जमिनीवरील अतिक्रमण हे बांधकामाच्या किंवा ताबा मिळवण्याच्या स्वरूपात असते.
sakal exclusive
sakal exclusivesakal

सोलापूर : जमिनीची मालकी एका व्यक्तीकडे असते, पण दुसरा व्यक्ती हेतुपुरस्सर त्या जमिनीवर अतिक्रमण करताना दिसून येतो. त्या जमिनीवर मालकीचा दावा सांगतो. जमिनीवरील अतिक्रमण हे बांधकामाच्या किंवा ताबा मिळवण्याच्या स्वरूपात असते. अशावेळी अतिक्रमण हटवण्यासाठी नेमकी कुठे दाद मागता येते? मूळात अतिक्रमण म्हणजे काय? याबद्दल अनेकांना माहिती नसते.

कोणताही कायदेशीर करार न करता जागा मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या इच्छेविरुद्ध एखाद्या भूभागावर ताबा सांगणे, याला अतिक्रमण असे म्हटले जाते. यामध्ये शेतात बांध घालणे, शेतीवर ताबा मिळवणे, दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीतील काही भागात बांधकाम करणे (हौद, जिना असे), दुसऱ्याच्या मालकीची जमीन स्वत:ची असल्याचा दावा करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. त्यासाठी दिवाणी न्यायालयातून दाद मागता येईल. पण, अतिक्रमण होवू नये म्हणून वेळोवेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

अतिक्रमणाची प्रमुख ४ कारणे...

  • १) जमिनीचा मालक बाहेरगावी राहत असल्यास अतिक्रमण केले जाते.

  • २) दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जमिनीच्या दरांमुळेही अतिक्रमण होते.

  • ३) वारस नसलेलं कुटुंब किंवा गरीब कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर ताबा सांगितला जातो.

  • ४) प्लॉटला कंपाऊंड किंवा शेतजमिनीच्या बांधाला खुणा नसल्यास अतिक्रमण केले जाते.

अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कोणाची?

खासगी जमिनीवरील अतिक्रमणात शासकीय यंत्रणा, तहसीलदार, जिल्हाधिकारी दखल देऊ शकत नाही. ते हटवण्याची जबाबदारी संबंधित जमीन मालकाचीच असते. नेमकी हीच बाब अनेकांना माहिती नसल्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी ते सरकारी कार्यालयात अर्ज करतात, खेटे मारतात. पण, त्यात फक्त वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे खासगी जागेवर अतिक्रमणाविरोधात वेळ वाया न घालवता दिवाणी न्यायालयात दाद मागायला हवी. त्याठिकाणी हमखास न्याय मिळतो.

अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया काय?

खासगी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास त्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करता येते. पण, पोलिस लगेचच कारवाई करतील, अशी अपेक्षा करता येत नाही. कारण, खासगी जमिनीवरील अतिक्रमण ही बाब दिवाणी स्वरुपाची आहे. याबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नाही. खासगी मालकीच्या जमिनीतील अतिक्रमण दूर करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागणे हाच एकमेव उपाय आहे. पण, अतिक्रमणाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याचा दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून वापर करता येतो. जमिनीवरील मूळ मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे, जमीन मोजणीचा नकाशा इत्यादींसह दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर मग न्यायालयाच्या आदेशाने कोर्ट कमिशन नेमून संबंधित भूभागाची किंवा जमिनीची मोजणी केली जाते. त्यावरून अतिक्रमण झाले की नाही हे सिद्ध करता येते.

अतिक्रमण टाळण्यासाठी ३ उपाय...

  • १) जमिनीचा मूळ मालक बाहेरगावी वास्तव्यास असल्यास जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील विश्वासू व्यक्तीकडे (पॉवर ऑफ अटर्नी) सोपवता येऊ शकते.

  • २) जमिनीच्या संरक्षणासाठी भाडेकरू नेमता येईल, पण भाडेकरू ठेवणार असल्यास जवळील पोलिस ठाण्यात त्याचे व्हेरिफिकेशन करून घ्यावे.

  • ३) आपल्या मालकीच्या जमिनीला कंपाऊंड करता येईल. मालमत्तेभोवती बोर्ड लावता येईल आणि वेळोवेळी जमिनीला भेट देऊन पाहणी करावी.

दिवाणी न्यायालयातून मिळेल न्याय

जागा किंवा जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात संबंधित जागा मालकाने पुराव्यानिशी दिवाणी न्यायालयात धाव घ्यावी. तज्ज्ञ विधिज्ञांचा सल्ला घेऊन न्यायालयात दावा दाखल केल्यास निश्चितपणे काही दिवसांत न्याय मिळतो.

- ॲड. जयदीप माने, कायदेतज्ज्ञ, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com