राष्ट्रवादीपाठोपाठ आता कॉंग्रेसचा हा नेता ED च्या रडारवर: Congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED

Congress: राष्ट्रवादीपाठोपाठ आता कॉंग्रेसचा हा नेता ED च्या रडारवर

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडी आणि आयकर विभागाने एकत्रित धाडी मारल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता एका कॉंग्रेस नेत्याचे नाव चर्चेत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेस नेते अस्लम शेख यांना इशारा दिला आहे. (Hasan Mushrif Congress Aslam shaikh should prepare to ED action )

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतानाअस्लम शेख यांचं नाव घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सर्व घोटाळेबाज मंत्र्यांचे घोटाळे काढणार. पुढे अस्लम शेख यांनी तयारी करून ठेवायची आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

सोमय्या यांनी अस्लम शेख यांचं नाव घेतल्याने अस्लम शेख यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सोमय्या यांनी शेख नेमकं कोणत्या घोटाळ्यात अडकले आहेत? याबद्दल काही माहिती दिली नाही.

हेही वाचा: Hasan Mushrif ED Raid: मुश्रीफ ईडीच्या भोवऱ्यात; नेमकं काय आहे प्रकरण?

माजी उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. परंतु शेवटी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला. आणि उद्धव ठाकरे यांची तर प्रचंड मेहरबानी होती. फक्त घोटाळे करणं एवढंच या सरकारचं काम होतं असं सांगतानाच हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं होतं.

हेही वाचा: Sharad Pawar : शरद पवारांच्या शब्दाला काँग्रेसने डावललं?

त्याची चौकशी सुरू झाली आहे. हिसाब तर घेणारच आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने पहिली कारवाई केली आहे.