esakal | किरीट सोमय्या म्हणजे मुक्तविद्यापीठ, मुश्रीफांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif

किरीट सोमय्या म्हणजे मुक्तविद्यापीठ, मुश्रीफांची टीका

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (minister hasan mushrif) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहाराद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यालाच आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या (hasan mushrif replied to kirit somaiya) यांना रोखठोक उत्तर दिले आहे.

हेही वाचा: मुश्रीफांचा पलटवार, सोमय्यांविरोधात दाखल करणार १०० कोटींचा दावा

किरीट सोमय्या हे बिचारे आहेत. त्यांना काहीही माहिती नसते. त्यांना चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असावी. म्हणून ते असे आरोप करतात. किरीट सोमय्या हे मुक्त विद्यापीठ आहेत. ते कधीही काहीही बोलून जातात. चंद्रकांत दादा मंत्री होण्यापूर्वी काय परिस्थिती होती हे किरीट सोमय्यांनी समजून घ्यायला पाहिजे. मुळातच ते बिचारे आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळे जाळणे, निषेध करणे असे काम करू नये. त्यांना काहीच माहिती नसताना ते उगाचच बोलत असतात, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

किरीट सोमय्या नेमके काय म्हणाले?

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे. बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत, असे गंभीर आरोप सोमय्यांनी केले आहेत.

loading image
go to top