Hasan Mushrif : मुश्रीफांच कोलकत्ता कनेक्शन? मोठी अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp Hasan Mushrif

Hasan Mushrif : मुश्रीफांच कोलकत्ता कनेक्शन? मोठी अपडेट

कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल आणि पुणे येथील घरांवर ईडीच्या (ED Raids) अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मुश्रीफांच कोलकत्ता कनेक्शन असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

मराठी वृत्तवाहिनने दिलेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांनी कोलकत्ता येथील १५ वर्षापूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात ५० कोटीची गुंतवणुक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेल कपन्यांचा वापर करुन काळा पैसा वळवल्याचा आरोप ईडीने मुश्रीफांवर केला आहे.

दरम्यान, मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत ईडी चौकशीला सहकार्य करणार असल्याची माहिती दिली. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांचा काहीही दोष नसतो. सरकारी अधिकारी कोणाच्या तरी सांगण्यावरुन येतात. असे सांगत मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

Amit Deshmukh: आता चौथं सरकार...भाजप प्रवेशावर अमित देशमुखांचे सूचक वक्तव्य

यासोबतच आरोपांबाबत खुलासे केले आहेत. सौमय्यांना पुन्हा डिवचण्यात रस नाही. सौमय्या कोल्हापूरला येणार आहेत. त्यांनी माझ्या कामाची दखल घ्यावी. असही यावेळी मुश्रीफ म्हणाले.

अप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखानातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी छापेमारी मारण्यात आल्या. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Politics : "आज भाच्याने सगळ्यांना 'मामा'बनवलं"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती.

टॅग्स :Hasan Mushrif