''फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत, नसता त्यांनी शपथ घेतली असती'', मुश्रीफांचा गौप्यस्फोट

''फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत, नसता त्यांनी शपथ घेतली असती'', मुश्रीफांचा गौप्यस्फोट

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा जयंत पाटील हेदेखील आमच्यासोबत येणार होते, असा गौप्यस्फोट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. फक्त एका गोष्टीमुळे ते आमच्यासोबत आले नाहीत, असं ते म्हणाले.

अजित पवार यांनी ८ आमदारांना सोबत घेऊन २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता त्यांच्यासोबत ४५ आमदार असल्याचा दावा केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद निवडणूक आयोगामध्ये आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. आमचाच पक्ष खरा असल्याचा दावा दोन्ही गटांकडून होतेय.

''फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत, नसता त्यांनी शपथ घेतली असती'', मुश्रीफांचा गौप्यस्फोट
Lalit Patil : ललित पाटीलवर उपचार करणारे 'ससून'चे डीन?, महत्त्वाचं डॉक्युमेंट आलं समोर

त्यातच आता अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी एक खुलासा करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीक केलीय. ''जयंत पाटील हे एका गोष्टीमुळे आमच्यासोबत ते आलेले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्यासोबतच शपथ घेतली असती. ती गोष्ट नेमकी काय आहे ते मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन.'' असं मुश्रीफ म्हणाले.

''फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत, नसता त्यांनी शपथ घेतली असती'', मुश्रीफांचा गौप्यस्फोट
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! राज्य सरकारकडून शिंदे समितीला मुदतवाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेवर हसन मुश्रीफ यांनी मौन बाळगलं. मराठा समाजाच्या नागरिकांनी आज सकाळी माझी गाडी अडवली पण मी त्यांचं समाधानकारक उत्तर दिलेलं आहे, न्यायालयात टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं, यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं मुश्रीफांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com