हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले! ग्रामीण पोलिस अन्‌ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १८ लाखांचे गुळमिश्रित रसायन अन्‌ दारू नष्ट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी ७ ते १९ मार्च या १३ दिवसांत सोलापूर तालुका पोलिसांनी ११ लाख ६८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तर बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन तांड्यावर छापे टाकून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
solapur
solapursakal

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी अवैध हातभट्टी दारु निर्मिती, वाहतूक व विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी पाच पथके नेमली आहेत. ७ ते १९ मार्च या १३ दिवसांत सोलापूर तालुका पोलिसांनी ११ लाख ६८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तर बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन तांड्यावर छापे टाकून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सोलापूर तालुका पोलिसांनी भानुदास तांडा, सेवालालनगर, बक्षीहिप्परगा, गुळवंची व मुळेगाव तांडा या परिसरातील हातभट्ट्या उध्दव्‌स्त केल्या. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर व सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदशर्नाखाली ७ ते १९ मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात पाच लाख ४२ हजार ६०० रूपयांचे १५ हजार ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन नष्ट करून दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल केले.

मुळेगाव तांडा, समशापूर, बक्षीहिप्परगा व सेवालालनगर तांडा येथे चोरून हातभट्टी विकणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करून दोन हजार ४०५ लिटर (अंदाजे किंमत दीड लाख रुपये) हातभट्टी हस्तगत केली. बक्षीहिप्परगा (ता. दक्षिण सोलापूर) येथे जुगार खेळणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात दुचाकींसह चार मोबाइल आणि एक लाख एक हजार ३४० रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य असा तीन लाख ७४ हजार ३४० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ठळक बाबी...

  • - १५ हजार ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन व दोन हाजर ४०५ लिटर हातभट्टी नष्ट

  • - अवैध जुगार खेळणाऱ्यांविरूध्द कारवाई करून तीन लाख ७४ हजार ३४० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

  • - १३ दिवसांच्या विशेष मोहिमेत एकूण ११ लाख ६८ हजार ३९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

एक्साईजच्या कारवाईत साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (ता. २०) मुळेगाव तांडा, वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांडा परिसरात टाकलेल्या छाप्यात आठ गुन्हे दाखल केले. त्याठिकाणाहून १६ हजार ४०० लिटर गुळमिश्रित रसायनासह ४०० लिटर हातभट्टी जप्त केली. वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथे धाड टाकून सहा लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरिक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सुनील कदम, दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, धनाजी पोवार, सुखदेव सिद, समाधान शेळके, सचिन गुठे, अंजली सरवदे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान अमित गायकवाड, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, नंदकुमार वेळापूरे, चेतन व्हनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख, दिपक वाघमारे व संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com