एचडीएफसी बॅंकेला मनसेचा "अल्टिमेटम' 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - एचडीएफसी बॅंकेचा फोन बॅंकिंग क्रमांक गुगलवर शोधताना गुजराती ही मुंबईची प्रादेशिक भाषा दाखवण्यात आल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात आयता मुद्दा सापडला आहे. याची दखल घेत मनसेने मुंबईची भाषा मराठी करण्यासाठी एचडीएफसीला 24 तासांची मुदत दिली आहे. 

कोणत्याही बॅंकेचा बॅंकिंग फोन क्रमांक विविध प्रदेशांसाठी वेगळा दिलेला असल्याने त्यांची भाषाही वेगळी असते. मात्र मुंबईची भाषा मराठी असताना त्याचा संबंध थेट गुजराती भाषेशी एचडीएफसीने जोडला. त्याच्याखाली मुंबईनंतर उर्वरित महाराष्ट्राची भाषा मराठी नमूद केली आहे. 

सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर आता मनसेनेही त्यात उडी घेतली आहे. एचडीएफसीच्या संकेतस्थळावर मुंबईची भाषा गुजराती केल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेत एचडीएफसीला 24 तासांचा "अल्टिमेटम' दिला आहे. त्यामुळे एचडीएफसीकडून कोणते पाऊल उचलले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: hdfc bank