

आरोग्य भरतीचा 'गट ड'चा रविवारी होणारा पेपर फुटल्याची धक्कादायाक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हीडिओ देखील समोर आला असून, त्यामध्ये परिक्षा केंद्रात आलेल्या प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा हा आधीच फुटल्याचं विद्यार्थ्यांनी समोर आणलं आहे. त्यावरून एमपीएससी समन्वय समितीच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, ते वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार करणार असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यावरूनच एमपीएससी समन्वय समीतीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आरोग्य विभाग, राज्याचे आरोग्य मंत्री आणि न्यासा या खासगी कंपनीविरोधात रोष व्यक्त केला आहे.
आमच्याकडे पेपर फुटल्याचे पूरावे...
एमपीएससी समन्वय समीतीचे सदस्य राहुल कौठेकर यांनी या घटनेची आपल्याला आधीच माहिती मिळाली असल्याचं सांगितलं. रविवारी दुपारी २ ते ४ दरम्यान असलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका रविवारी सकाळीच ८:३० वाजता काही लोकांकडे पोहोचल्या होत्या. मला अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले होते, पण तेव्हा माझ्याकडे पूरावे नव्हते. आता आपल्याकडे सर्व पुरावे आले असून, आपण पूण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती यावेळी राहुल कौठेकर यांनी दिली.
यंत्रणेवरचा विश्वास उडाला...
मी आरोग्य विभागाच्या क गटाचा फॉर्म भरला होता, मात्र मी त्या परिक्षेला गेलो नाही. कारण आम्हाला आता यंत्रणेवर विश्वासच राहीला नाही. त्यामुळे मी ड गटाच्या परिक्षेसाठी फॉर्म सुद्धा भरला नसल्याच्या भावना मयुर शिरोडे या विद्यार्थ्यानं व्यक्त केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोग्य भरती आणि प्रकरणात झालेला गोंधळ पाहता विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता या प्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.