आरोग्य विभागाच्या परीक्षेत न्यासाने घातला गोंधळ; अहवालात काय म्हटलंय?

Exam
Exam
Summary

आरोग्य विभागाने न्यासा या कंपनीला नोटीस पाठवली आहे. तसंच परीक्षेत कुठे आणि कसा गोंधळ झाला याची माहितीसुद्धा सरकारला दिली आहे.

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. पहिल्यांदा ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढावली होती. त्यानंतर पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात आली मात्र यातही मोठ्या प्रमाणाव गोंधळा झाला. अनेक केंद्रावर पेपर उशिरा पोहोचले. तर अनेक ठिकाणी पर्यवेक्षकच हजर नव्हते. आता याबाबत आरोग्य विभागाने न्यासा या कंपनीला नोटीस पाठवली आहे. तसंच परीक्षेत कुठे आणि कसा गोंधळ झाला याची माहितीसुद्धा सरकारला दिली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने सरकारला अहवाल पाठवला आहे.

आरोग्य विभागाने न्यासा कंपनीला राज्यभरात झालेल्या गट क परीक्षेबद्दल नोटीस पाठविली आहे. ज्यात आरोग्य विभागाने खाली झालेले घोटाळे स्वतः मान्य केले आहेत. सरकारला पाठवलेला अहवालात काय अडचणी आल्या आणि गोंधळ झाला याची माहिती दिली आहे.

Exam
Defamation case: राहुल गांधी राहणार गुजरात कोर्टात हजर; वाचा काय आहे प्रकरण

१) परीक्षा केंद्रावर पेपर उशीरा पोचविण्यात आले.

२) साकीनाका तसेच इतर ठिकाणी पेपर फोडण्यात आले किंवा फुटले

३) जास्तीत जास्त परीक्षा केंद्रावर मोबाईल jammer नव्हते किंवा असूनही कार्यरत नव्हते

४) न्यास चे कर्मचारी प्रशिक्षित नव्हते

५) पेपर नेणाऱ्या पेटीचे वेळेवर लॉक उघडत नव्हते त्यामुळे पेपर उशीरा पोचले

६) कोल्हापुरात विद्यार्थी प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका घरी घेऊन गेले... ही गंभीर बाब...

७) कितीतरी सेंटर वर पर्यवेक्षक नव्हते किंवा गैरहजर होते

८) कितीतरी परीक्षा केंद्र परीक्षा असूनही लॉक होते किंवा उशीरा उघडण्यात आले

९) काही परीक्षा केंद्रावर वेगळ्याच पदाचे पेपर देण्यात आले... ex. नर्सिंग च्या विद्यार्थांना लॅब technician चे पेपर देण्यात आले

१०) वसंतदादा पाटील विद्यालय पिंपरी पुणे येथे १५ विद्यार्थांना प्रश्नपत्रिका च मिळाल्या नाहीत

११) क्रांतीवीर कॉलेज वाई सातारा येथे एका विद्यार्थाला सेंटर कोड आणि सेंटर नावाशिवाय हॉल तिकीट दिले गेले

परीक्षेच्या आय़ोजनात झालेल्या या गोंधळाबाबत पाठवलेल्या नोटीसीला ४८ तासात न्यासाने उत्तर देणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांना ब्लॅक लिस्ट करायचे की नाही याबाबत निर्णय़ घेण्यात येईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. न्यासाला नोटीस पाठवण्यात आली असताना आणि त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु असताना आणखी एका परीक्षेची जबाबदारी न्यासावर आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला आरोग्य विभागाची गट ड परीक्षा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com