आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही - राजेश टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही - राजेश टोपे

राज्य सरकारने सुपरमार्केट (Super Market) आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर गुरवारला मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलाय. मात्र या निर्णयावर भाजपसह अनेकांनी विरोध दर्शवलाय. या निर्णयावर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली. आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, असे टोपे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.

हेही वाचा: "आतापर्यंत देशात साडेचार कोटी मुलांचे लसीकरण"

"राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतलाय. मद्यपानास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. मद्यपान हानिकारक आहेच, त्याविषयीची जागृती आपण करत असतो. आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही. आम्ही कुणाला ‘वाइन प्या’ असे म्हणूच शकत नाही, म्हणणारही नाही", असेही टोपे म्हणाले.

Web Title: Health Minister Rajesh Tope Says The Department Of Health Can Never Promote Alcoholism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..