
कोरोना युद्धात घराघरात जाऊन काम करणाऱ्या आशा वर्करच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. मंत्रीमंडळासमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे.
आशा वर्कर्सच्या मानधनात होणार 'इतक्या' हजारांची वाढ? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता..
मुंबई : कोरोना युद्धात घराघरात जाऊन काम करणाऱ्या आशा वर्करच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. आशा वर्कर च्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ होणार आहे. उद्या मंत्रीमंडळासमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे. आशा वर्करचे मानधन वाढवण्याबाबत मंत्री राजेश टोपे आग्रही असल्याचे समजते.
राज्यभरात 65 हजाराहून अधिक आशा वर्कर आहेत. कोरोना युद्धात त्या झोकून काम करत आहेत. मात्र त्यांना केवळ 1 हजार रुपये मानधनावर काम करावे लागत आहे. त्यांचे मानधन वाढवण्यात यावे अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. सार्वजनिक आरोग्य विभागाने या मागणीची दखल घेतली असून आशा वर्कर चे मानधन 2 हजार रुपयांची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: मुंबापुरी तहानलेलीच, शहरात 8 तर उपनगरात फक्त 2 टक्के पावसाची नोंद
त्यामुळे आशा वर्करचे मानधन आता 3 हजार रुपये इतके होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकारवर साधारणता 156 कोटींचा बोजा पडणार आहे.
कोरोना संकटात राज्यभरातील आशा वर्कर प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून काम करत आहेत. मुंबईतील झोपडपट्टयांत तर ग्रामीण भागात घराघरात जाऊन सर्वे तसेच लोकांच्या ऑक्सिजनची तपासणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. जीवाचा धोका पत्करून आशा वर्कर हे काम करत आहेत.
हे काम करतांना काही आशा वर्करना कोरोनाची बाधा देखील झाली. मात्र तरीदेखील आशा वर्कर धोका पत्करून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे आशा वर्कर च्या मानधनात वाढ करण्याची मागणी मान्य करण्यात आली.
राज्यभरातील आशा वर्कर या तुटपुंजा मानधनात कोरोना योद्धा म्हणून सरकार सोबत काम करत आहेत. त्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांची मागणी मान्य केली असून मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
health ministry thinking of increase in payment of aasha workers
Web Title: Health Ministry Thinking Increase Payment Aasha Workers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..