मुंबापुरी तहानलेलीच, शहरात 8 तर उपनगरात फक्त 2 टक्के पावसाची नोंद

मुंबापुरी तहानलेलीच, शहरात 8 तर उपनगरात फक्त 2 टक्के पावसाची नोंद

मुंबई : देशातील 70 टक्के भागात निर्धारित वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला असून, आतापर्यंत 191 जिल्हयांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत 60 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. 1 ते 22 जून या कालावधीत महाराष्ट्रात 49 टक्के एवढया पावसाची नोंद झाली असून, मिलीमीटरमध्ये ही नोंद 193.8 झाली आहे. तर मुंबई शहरात 8 टक्के तर उपनगरात फक्त 2 टक्के एवढया पावसाची नोंद आहे. एका अर्थाने देशासह राज्यात पुरेसा पाऊस होत असताना मुंबापुरी मात्र तहानलेलीच आहे.

मान्सूनने देशाच्या 70 टक्के भाग व्यापला आहे. दक्षिण आणि पूर्वोत्तर राज्यांनंतर मान्सून आता मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशात सक्रीय झाला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहारमध्ये सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत 60 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

1 जून ते 23 जून या काळात देशातील 681 जिल्हयांपैकी 28 टक्के म्हणजे 191 टक्के जिल्हयांत 60 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. 23 टक्के जिल्हयांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत 20 ते 59 टक्के पाऊस झाला. मध्य प्रदेशासह पूर्व उत्तर प्रदेशात मान्सून एक आठवड्यापूर्वी दाखल झाला आहे.

पूर्वोत्तर राज्यांत मान्सून दाखल होण्यास पाच दिवस अधिक लागले. मान्सून आणि मान्सून पुर्व पावसाचा विचार करता देशातील 51 टक्के जिल्हयांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. 26 टक्के जिल्हयांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, 25 ते 28 जून या काळात मान्सूनचा पाऊस हिमालयाच्या पायथ्याशी सरकण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज असून, पूर येण्याची शक्यता आहे. याच काळात मध्य भारतात पावसाचे प्रमाण कमी होईल. उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतात अद्यापही मान्सूनला सुरुवात झालेली नाही.

only eight percent rainfall in mumbai and only 2 percent rainfall in suburbs of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com