ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला येणार बळकटी; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी घेतला मोठा निर्णय

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 29 July 2020

गामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका या कायमच टिकेचा विषय ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नवीन रुग्णवाहिका ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुंबई - गामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका या कायमच टिकेचा विषय ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नवीन रुग्णवाहिका ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे, ग्रामीण भागात अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

कोरोना नसतानाही आमच्या पेशंटवर कोविड औषधांचा वापर, म्हणूनच रुग्णाचा झाला मृत्यू", मुंबईतील रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना 500 नवीन रुग्णवाहिका पुरवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नवीन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. 

खुशखबर! मुंबईत कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घसरतंय... वाचा कोणी दिली ही माहिती

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, मार्च मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या भाषणात उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या 1000 रुग्णवाहिका टप्प्या टप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. यावर्षी 500 आणि पुढील वर्षी 500 अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार असे त्यांनी जाहिर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्ती योग्य नाहीत. म्हणून नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. 

रिया चक्रवर्तीने केला सुप्रीम कोर्टात अर्ज, सीबीआय तपासाची मागणी करणारी आता म्हणतेय तपास मुंबई पोलिसांकडेच द्या

एका महिन्यात 500 रुग्णवाहिका - 
यावर्षी 500 नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी 89 कोटी 48 लाख अंदाजीत खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. या 500 नविन रुग्णवाहिका 253 प्राथमिक आरोग्य केंद्र, 137 ग्रामीण रुग्णालये, 106 जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि 4 प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

---------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health services in rural areas will be strengthened; Health Minister Rajesh Topi took a big decision