संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना अद्याप अटक न झाल्याने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (ता. 25) सुनावणी होणार आहे. या सुनावणीला स्वत:हून हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने भिडे यांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. 
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी भिडे यांच्यासह मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात दोन जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिडे आणि एकबोटे यांच्या अटकेसाठी राज्यभरात विविध आंबेडकरी पक्ष आणि संघटनांनी आंदोलने-मोर्चे काढले होते. 

भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातही विरोधकांनी कामकाज रोखून धरले होते. यानंतर एकबोटे यांना अटक करण्यात आली; मात्र भिडे यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे सरकारच भिडे यांना पाठीशी घालून कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याबाबत ऍड. योगेश मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. उच्च न्यायालयाचे न्या. आर. एम. सावंत आणि न्या. रेवती ढेरे-मोहिते यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. सरकारकडून भिडे यांचा बचाव का केला जात आहे, या मुद्द्यावर युक्तिवाद केला जाणार आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील डॉ. सुरेश माने यांनी सांगितले. 
 
Web Title: Hearing on petition against Sambhaji Bhide