esakal | राज्यात उन्हाचा चटका वाढला; विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

The heat wave Warning to Vidarbha today an intensifies in the maharashtra

होळीनंतर लगेचच कमाल तापमानाच्या पाऱ्याने ४३ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. येत्या चार ते पाच दिवसांत वातावरणात आणखी बदल होईल. उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊन कमाल तापमानाचा पारा अजून काहीसा वाढेल.

राज्यात उन्हाचा चटका वाढला; विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये हा चटका कायम राहणार असून, विदर्भात मंगळवारी (ता. ६) उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रम्हृपूरी येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. छत्तीसगडचा दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होत आहे. यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात येत्या शनिवारी (ता. १०) विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याच्या सूत्रांनी दिला.

होळीनंतर लगेचच कमाल तापमानाच्या पाऱ्याने ४३ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. येत्या चार ते पाच दिवसांत वातावरणात आणखी बदल होईल. उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊन कमाल तापमानाचा पारा अजून काहीसा वाढेल. विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट काही प्रमाणात राहणार असल्याने पुन्हा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

अंदमान समुद्राचा उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तर उत्तर कर्नाटक ते तमिळनाडूच्या उत्तर-दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून तेलंगण ते उत्तर तमिळनाडू या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याने उन्हाचा चटका, वाढता उकाडा, उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस असे वातावरणात बदल होत आहेत. यामुळे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात व कोकण-गोव्याच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

पुण्यात कमाल तापमान चाळीशीजवळ
पुण्यात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान गेल्या आठवड्यात नोंदले जात होते. हा कमाल तापमानाचा पारा आता चाळीशीच्या दिशेने उसळी मारत असल्याचे दिसते. शहरात सोमवारी किमान तापमानाचा पारा ३९.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा २.५ अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. किमान तापमानाचा पारा १९.८ अंश सेल्सिअस नोंदला. शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहील. पण, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाईल. त्यानंतर हे तापमान चाळीशीपर्यंत वाढेल.

loading image