

Heatwave Hits Maharashtra Hard
Esakal
राज्यासह देशात तापमानात प्रचंड वाढ झाली असून महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. विदर्भात उष्णतेचा कहर झाला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ४२ ते ४६ अंश सेल्सिअस इतका आहे. अकोल्यात सोमवारी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावतीत ४६.६ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. दरम्यान, राज्यात उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत चालली आहे. उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. Maharashtra heatwave update temperatures soar to 46 point 6 degree Celsius in Amravati