आंबोलीत पावसाने गाठले इंचाचे शतक

आंबोली - येथे पावसाने इंचाचे शतक पार केले असून, आतापर्यंत 115 इंच पाऊस झाला आहे.
आंबोली - येथे पावसाने इंचाचे शतक पार केले असून, आतापर्यंत 115 इंच पाऊस झाला आहे.

आंबोली - राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत सरासरीने इंचाचे शतक पार केले. आतापर्यंत येथे 115 इंच पाऊस झाला आहे. जूनमध्ये जिल्ह्यात इतरत्र जास्त पाऊस झाला असला, तरी येथे पाऊस कमी झाला; मात्र जुलैच्या पंधरावड्यात ही सरासरी भरून निघाली.

आंबोलीचा पाऊस आणि येथील वर्षा पर्यटन हे देशभरातील पर्यटकांना आकर्षित करते. येथे हंगामी पावसामध्ये राज्यात सर्वांत जास्त सरासरी नोंदवली जाते. जूनमध्ये येथे यंदा वेळेत पाऊस सुरू झाला; मात्र तो अधूनमधून विश्रांती घेत पडत होता. येथे सहसा जूनमध्येच सरासरी इंचाचे शतक पूर्ण होते; मात्र या वर्षी तो 50 इंचही झाला नव्हता. जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला आणि धबधबेही पूर्ण क्षमतेने कोसळू लागले. यामुळे आतापर्यंत 115 इंच (2875 मिलिमीटर) पाऊस झाल्याची माहिती पर्जन्यमापक प्रल्हाद ऊर्फ भाऊ ओगले यांनी दिली.

दरवर्षी 300 इंचांवर साधारणतः पाऊस जातो. या वर्षी ही सरासरी भरून काढणार आहे. गेल्या तुलनेत या वर्षी एक आठवडा श्रावण उशिरा असल्याने धुक्‍याचे प्रमाण मात्र कमी आहे.
- प्रल्हाद ऊर्फ भाऊ ओगले, पर्जन्यमापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com