Rain Updates: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची मदत; मुख्यंत्र्यांची घोषणा

मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती
Maharashtra weather Update
Maharashtra weather Updateesakal
Updated on

मुंबई : मागच्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याला पावसाने पुन्हा झोडपलं आहे. त्याबरोबर काही भागात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्यांना सरकारकडून मदत देण्यात येणार आहे. पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.

(Maharashtra Heavy Rain Updates)

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. या भागांत मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Maharashtra weather Update
Video: पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये दरोडेखोराचा मृत्यू; व्हिडिओ आला समोर

ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur Wari Live Updates
Maharashtra Farmer Loan Waiver Third List 2026
CM Devendra Fadnavis Performs Official Vitthal Mahapuja
Dr. Shirish Valsangkar
Marathi News Esakal
www.esakal.com