
Heavy rainfall floods villages in Maharashtra, rivers overflow as IMD issues warning for next 5 days.
esakal
Summary
महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार असून पूरस्थिती तीव्र होण्याची शक्यता.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेती, गावे आणि नद्या पाण्याखाली.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २४ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार.
राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेती आणि गावे पाण्याखाली गेली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून धुव्वाधार पावसाचा मुक्काम अजून वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.