पावसाने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही राज्यभर हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईची दाणादाण उडाली. शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. रस्ते पाण्यात गेले असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसले. मराठवाड्यात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी उघडीप होती. धरणांतून विसर्ग सुरू आहे. विदर्भात पिकांचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर व कोकणातही जोर कायम आहे.