हेलिकॉप्टर खरेदी अखेरीस मार्गी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - राज्य सरकारची बहुप्रतीक्षित हेलिकॉप्टर खरेदी अखेरीस मार्गी लागली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींसाठी s76- D हे तर नक्षलवादी भागातील मोहिमांसाठी H145 हे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय विमानचालन संचालनालयाने घेतला आहे.

राज्य सरकारच्या ताफ्यातील दोन हेलिकॉप्टरचा वापर गेल्या वर्षापासून बंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षभरात हेलिकॉप्टरच्या अपघातातून तीन वेळा बचावल्यानंतर राज्य सरकारने जुनी हेलिकॉप्टर निकाली काढून दोन नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 

असा व्यवहार 
अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींसाठी ः अमेरिकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल ऑपरेशन या कंपनीकडून ‘ s76- D’.   १२७ कोटी ११ लाख रुपये 

नक्षलविरोधी मोहिमांसाठी- जर्मनी येथील एअरबस हेलिकॉप्टर कंपनीकडून ‘H145’. 
७२ कोटी ४३ लाख रुपये

Web Title: helicopter purchases in the end