काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याचा कल; पण...- खर्गे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

जनतेने काँग्रेस पक्षाला विरोधी बाकावर बसण्याचा कल दिला आहे, परतु, काय काय निर्णय घ्यायचा याचा अंतिम निर्यण हे हायकमांड घेणार असल्याचे मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : जनतेने काँग्रेस पक्षाला विरोधी बाकावर बसण्याचा कल दिला आहे, परतु, काय काय निर्णय घ्यायचा याचा अंतिम निर्यण हे हायकमांड घेणार असल्याचे मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले आहे. उद्या भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांनी बोलवाले असल्याने आजचा दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात खूप महत्वाचा बनला आहे. भाजप नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू असताना काँग्रेसकडून शिवसेनेला झुलवत ठेवल्याचे चित्र दिसत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजप विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता असताना दुसरीकडे काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांना जयपूरला हलविले आहे. तेथे राज्यातील नेते कालच पोहोचले असून आमदारांशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितले. पण, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपने केली विरोधात बसायची तयारी?

दरम्यान, शिवसेनेने हॉटेल रीट्रीटमध्ये आमदारांची बैठक घेतली असून शह-काटशहाच्या राजकारणाला वेग आला आहे. भाजपाने 4 वाजेपर्यंत शिवसेनेला अल्टीमेटम दिला आहे. शिवसेना आपल्या मतावर ठाम असून शिवसेनेची ताठर भूमिका असून अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांचा दावा कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high command delhi will take decision about shiv senas says Mallikarjun Kharge