esakal | अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, याचिका निकाली काढण्यास HC चा नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Anil-Deshmukh

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, याचिका निकाली काढण्यास HC चा नकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : १०० कोटी वसुली प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh case) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशमुख यांनी ईडीचे समन्स रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने याचिका निकाली काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे देशमुखांना सध्यातरी कुठलाही दिलासा मिळू शकला नाही.

हेही वाचा: अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुख तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या नागपुरातील आणि मुंबईतील घरांवर ईडी आणि सीबीआयने छापे टाकले. त्यानंतर ईडीने त्यांना अनेकदा समन्स पाठवून देखील ते चौकशीसाठी गैरहजर होते. काहीवेळा त्यांच्या वकिलांनाच ईडीच्या कार्यालयात पाठविले होते. आता पुन्हा ईडीचे समन्स टाळण्यासाठी देशमुखांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधीश शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने देशमुखांना कोणताही दिलासा दिला नाही. त्यांना विभागीय खंडपीठासमोर अर्ज करण्यास सांगितले आहे.

loading image
go to top