राज्यभरात एकाच दिवशी पाच हजार जणांना कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

संपूर्ण देशासह राज्य लॉकडाउनमधून बाहेर येत आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यामुळे शहरांमधील रस्त्यांवर, चौकांमध्ये गर्दी वाढल्याचे चित्र वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसत आहे.

पुणे - राज्यात गेल्या चार महिन्यांमधील सर्वाधिक चाचण्या शुक्रवारी झाल्या. त्यापैकी पाच हजार 24 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले. 

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने दीड लाखाचा टप्पा ओलांडला. 
संपूर्ण देशासह राज्य लॉकडाउनमधून बाहेर येत आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शहरांमधील रस्त्यांवर, चौकांमध्ये गर्दी वाढल्याचे चित्र वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसत आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये 23 हजार 849 नमुने घेण्यात आले. त्यांची तपासणी वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून करण्यात आली. त्यापैकी पाच हजार 24 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले. राज्यात एका दिवसात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा हा नवा उच्चांक आहे. यापूर्वी एका दिवसात चार हजारांपर्यंत रुग्णांचे निदान झाले होते. ही वाढ अनलॉक आणि वाढलेल्या तपासण्या या प्रमाणात आहे, असेही राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात आतापर्यंत आठ लाख 71 हजार 875 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 23 हजार 849 नमुने हे अवघ्या 24 तासांमध्ये प्रयोगशाळांमधून तपासले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात 2362 जण कोरोनामुक्त 
राज्यात आज 2362 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत 79 हजार 815 कोरोनामुक्त बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.25 टक्के आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest number of tests in the last four months in the state