अशांतता निर्माण होईल असे कृत्य करू नका, गृहमंत्र्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

हिजाब प्रकरण: अशांतता निर्माण होईल असे कृत्य करू नका, गृहमंत्र्याचे आवाहन

हिजाब प्रकरणावरून देशभरातुन पडसाद उमटत आहे. राजकीय स्तरातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. अशांतता निर्माण होईल असे कृत्य करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

कोणत्याही राज्यातील मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्रातील (Maharashtra) परिस्थीती बिघडवणे योग्य नाही. शिक्षण हेच प्राधान्य असले पाहिजे, असेही ते म्हणाले. हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेत .

हेही वाचा: Hijab Row : महिलांनी आपल्या हक्कासाठी उभं राहीलं पाहिजे; 'त्या' मुलीचं आवाहन

कर्नाटकातील (Karnataka) उडुपी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात मुस्लिम मुलीनी हिजाब (Hijab) घालू देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. हिजाब परीधान करून वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप या मुस्लीम विद्यार्थिनींनी केला होता त्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला.

Web Title: Hijab Case Dont Act That Will Burst Peace Home Ministers Appeal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..