हिंदुत्वाची हाक हाच युतीसाठीचा प्रस्ताव

मृणालिनी नानिवडेकर
मंगळवार, 29 जानेवारी 2019

मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी मंडळी पडद्याआडून करीत आहेत. गेले दोन आठवडे सुरू असलेल्या या प्रयत्नांना येत्या आठवड्यात मूर्त रूप येईल, असेही एका उच्चपदस्थाकडून समजले.

राममंदिराच्या उभारणीसाठी थेट अयोध्या गाठणाऱ्या शिवसेनेने भगवी टाळी त्वरेने द्यावी अशी भाजपची अपेक्षा असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने ‘सकाळ’ला सांगितले. टाळी देणारा हात युती संबंधात शिवसेना पुढे करेल काय, याकडे भाजप लक्ष ठेवून आहे. शिवसेनेने हात पुढे केल्यास राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा चर्चेसाठी संपर्क करतील असेही समजते. बिहारमधील पाटण्यात भाजपप्रणीत एनडीएची सभा तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सभेला शिवसेनेने हजर रहावे असे निमंत्रण युतीला अनुकूलता दाखवली गेली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने पाठवण्याच्या तयारीत आहेत. भाजप आणि शिवसेनेने जाहीरपणे परस्परांविरोधात विधाने करणे सुरू ठेवले असले, तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांचे महाराष्ट्रातील नेते सतत संपर्कात आहेत असेही समजते. 

शिवसेनेला दोन अधिक जागा? 
शिवसेनेने युतीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. मात्र, खासगीत बहुतांश खासदारांनी युती हवी असे सांगितल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. सध्या महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप २६ तर शिवसेना २२ जागा लढवते. या वेळी २४-२४ जागांचा आग्रह होण्याची शक्‍यता आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर आणि भिवंडी या दोन मतदारसंघांवर शिवसेना दावा करणार आहे. पालघर मतदारसंघ युतीतील महाभारताचे कारण ठरला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu Yuti Shivsena BJP Politics Devendra Fadnavis