Video : असा मिळाला आंदोलक विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा घरचा पत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video : असा मिळाला आंदोलक विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा घरचा पत्ता

Video : असा मिळाला आंदोलक विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा घरचा पत्ता

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ( Student Protest In Maharashtra ) घेण्याविरोधात राज्यातील विविध शहरांमध्ये सोमवारी अचानक मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली. हे विद्यार्थ्यी केवळ आंदोलनावर थांबले नाही तर त्यांनी थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या निवासस्थानाबाहेर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांना खुद्द हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठक यानेच शिक्षण मंत्र्यांच्या घरचा पत्ता सांगितल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

विकास पाठकने केला होता सोशल मीडियावर व्हिडिओ

हिंदुस्थानी भाऊ यानेच 30 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर (Video ) केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सांगितल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाहीतर पाठक याने वेळ आणि किती वाजेपर्यंत आंदोलन करायचे याच्या सूचनादेखील दिल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे.

हेही वाचा: Student Protest: ऑफलाईन परीक्षांना विरोध; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन

हे ठरवून केलेले षडयंत्र

गेल्या दोन दिवसांपासून व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चिथवण्यात आल्याचंही प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे. यामध्ये मुंबईत, पुण्यात, नागपूरला आंदोलन करायचं असं या मुलांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळं हे ठरवून कुठल्यातरी संघटनेनं केलेलं कृत्य आहे. शिक्षण विभागाला याबाबत विद्यार्थ्यांनी काही निवेदन दिलंय की नाही याची मला माहिती नाही. पण जे व्हिडिओ समोर आलेत त्यामध्ये आम्ही दोन तीन दिवसात आंदोलनाचा धमाका करणार आहोत. सगळ्यांनी रस्त्यावर उतरा, असं आवाहनही यातून करण्यात आलं आहे. त्यामुळं हे षडयंत्र आहे असं वाटतं, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

Web Title: Hindustani Bhau Had Given The Address Of State Education Minister Varsha Gaikwad To Student Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top