Student Protest: ऑफलाईन परीक्षांना विरोध; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन

राज्यात इतर काही ठिकाणीही आंदोलन सुरू झाल्याचं समोर आलं आहे.
Student Protest Against Offline Exam
Student Protest Against Offline ExamSAKAL

दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Board exams) ऑफलाईन परीक्षांना (Offline Exams) विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि अकोल्यासह काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुणे, नागपुरसह अन्य काही शहरांत गर्दी केली. ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवलं, तर मग परीक्षाही ऑनलाईन घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे. (Student Protest Against Offline Exam)

Student Protest Against Offline Exam
दहावी, बारावी परीक्षांच्या बाबतीत १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे वर्षभर शाळा या ऑनलाइन होत्या. ऑनलाइन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि मागासभागातील ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली. ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेणं योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका असे सांगत, दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. मात्र वेगवेगळ्या शहरांत विद्यार्थी एकाच वेळी एकत्र कसे आले? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

दहावी-बारावी परीक्षा दरवर्षीप्रमाणेच

अकोल्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली.

या निर्णयाला विरोध करण्यासाठी दहावी आणि 12 वीचे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले होते. 300 च्या वर विद्यार्थी येथे आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच विद्यार्थी एकतेच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. शाळा जर ऑफलाईन असत्या तर परीक्षा ऑफलाईन घरण्यास हरकत नाही. मात्र, ऑनलाइन शाळा घेऊन ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना पटलेला नाही. परीक्षासंदर्भात बैठक घेताना शिक्षण मंत्री या ऑफलाईन बैठकीला उपस्थित न राहता ऑनलाइन उपस्थित होत्या. ऑफलाइन परीक्षेचा निर्णय ऑनलाइन बैठकीत कसा घेता, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

आमचे जरी लसीकरण झाले असले तरी आम्ही अजूनही मानसिक आणि बौद्धिक दृष्टीने ऑफलाईन परीक्षा देण्यास समर्थ नाही. परीक्षा न घेता या पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुढील वर्षी ऑफलाईन शाळा सुरू करून नंतर परीक्षा घ्यावात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिस याठिकाणी आले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com