Santosh Bangar : बांगर यांनी हिंगोलीत पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Bangar News

Santosh Bangar : बांगर यांनी हिंगोलीत पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं, कारण...

Hingoli: सत्तांतराच्या काळात प्रकाशझोतात आलेले आमदार संतोष बांगर सध्या नेहमीच चर्चेत असतात. हिंगोलीमध्ये आजही त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.

अतिवृष्टी आणि इतर कारणांनी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने हातचा घासदेखील हिरावला गेलाय. त्यातच पीक विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे आ. संतोष बांगर यांच्यासह शेतकऱ्यांनी हिंगोली येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर आज मोर्चा वळवला. परंतु या कार्यालयात कुणीही हजर नव्हतं. त्यामुळे बांगर यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.

हेही वाचा: Chhagan Bhujbal: आपल्या गडगंज संपत्तीबाबत भुजबळांनीच दिली माहिती! पाहा काय म्हणाले?

यावर्षी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने पिकं हातची गेलेली आहेत. जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. आताही परतीचा पाऊस धो-धो बरसतो आहे. मध्यंतरी गोगलगायने पिकं नेस्तनाभूत केली होती. त्यामुळे विमा भरलेले शेतकरी कंपनीकडे तक्रारी दाखल करतात. परंतु तक्रारी घेण्यापासून विमा कंपनीचे प्रतिनिधी टाळाटाळ करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तक्रारी घेतल्यानंतरही त्रुटी काढून शेतकऱ्यांनी विम्यापासून वंचित ठेवलं जातं. म्हणूनच शेतकऱ्यांना संताप अनावर होत आहे. याच अनुषंगाने आ. संतोष बांगर आक्रमक झाले होते.