Hingoli News: वसमतमध्ये गोदामाला आग, हळद कांडी व हळद पावडर जळून खाक

Hingoli News: वसमतमध्ये गोदामाला आग, हळद कांडी व हळद पावडर जळून खाक| A fire broke out at a godown in Wastam, burning turmeric sticks and turmeric powder |
Hingoli News fire
Hingoli News firesakal

Vasmat News: येथील परभणी रोडवरील साई अँग्रो कंपणीच्या गोदामाला सोमवार ता.२५ सकाळी तीन च्या दरम्यान आग लागली. या आगीत गोदामात साठवून ठेवलेली हळद कांडी व हळद पावडर जळून खाक झाले. नुकसानीचा आकडा कळू शकला नाही तसेच आगीचे कारणही निष्पन्न झाले नाही.

शहरातुन जाणार्या परभणी रोडवर लक्ष्मीकांत प्रसिद्ध मुरक्या यांचे हळदीवर प्रक्रिया करणारी मील आहे. तसेच हळद व हळदी पावडर साठवणूकीचे गोदाम आहे. सोमवारी सकाळी साडेतीन च्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. मात्र गोदामाला आग लागल्याचे सकाळी ५ च्या सुमारास कळाले.

Hingoli News fire
Hingoli Lok Sabha 2024: हिंगोलीत दुरंगी लढतीची शक्यता; वंचित, बहुजन समाज पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार

त्यानंतर वसमत व जिल्हाभरातील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. या वेळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १२ अग्निशमन दलाच्या जवानांनी आतोनात प्रयत्न केले. दुपारी ११ पर्यंत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण कळू शकले नाही तसेच नुकसाणीचा आकडाही दुपारपर्यंत कळू शकला नाही परंतू हळद कांडी व हळद पावडर जळून प्रचंड मोठे नुकसान झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

Hingoli News fire
Hingoli Crime News : हिंगोलीत व्यापाऱ्याचे साडेबारा लाख लुटले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com