"तो' ऐतिहासिक व्हिडीओ जोपासला संजीवराजेंनी 

विशाल पाटील
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सातारा - शिवपराक्रमाची साक्ष असलेला प्रतापगड (जि. सातारा) लाखो शिवप्रेमींचे ऊर्जास्थान आहे. शिवप्रताप दिन उत्साहात तेथे साजरा केला जातो. अफजलखानाचा वध केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती संपूर्ण देशभर पसरली. या प्रतापगडावर अश्‍वारूढ पुतळा बसविण्याचा निर्णय पुतळा स्मारक समितीने घेतला. समितीच्या स्वागताध्यक्षा सुमित्राराजे भोसले, अध्यक्ष मालोजीराजे नाईक-निंबाळकर, सभासद, तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बांधकाममंत्री बाळासाहेब देसाई, किसन वीर, गणपतराव तपासे, डी. एस.

सातारा - शिवपराक्रमाची साक्ष असलेला प्रतापगड (जि. सातारा) लाखो शिवप्रेमींचे ऊर्जास्थान आहे. शिवप्रताप दिन उत्साहात तेथे साजरा केला जातो. अफजलखानाचा वध केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती संपूर्ण देशभर पसरली. या प्रतापगडावर अश्‍वारूढ पुतळा बसविण्याचा निर्णय पुतळा स्मारक समितीने घेतला. समितीच्या स्वागताध्यक्षा सुमित्राराजे भोसले, अध्यक्ष मालोजीराजे नाईक-निंबाळकर, सभासद, तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बांधकाममंत्री बाळासाहेब देसाई, किसन वीर, गणपतराव तपासे, डी. एस. जगताप, बाबासाहेब शिंदे यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला. तो कार्यक्रम ता. 30 नोव्हेंबर 1957 रोजी हजारोंच्या साक्षीने पार पडला. 

त्याकाळी त्याची व्हिडिओ फिल्म बनविण्यात आली होती. या सोहळ्यास 60 वर्षे होऊन गेली. विशेष म्हणजे समितीचे अध्यक्ष मालोजीराजे यांचे नातू, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी ही फिल्म आजही जोपासून ठेवली आहे.

Web Title: historic video of pratapgad stored by sanjivraje after 60 years