esakal | नागपूरहून मुंबई विमानप्रवास?; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Anil_Deshmukh

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले.

नागपूरहून मुंबई विमानप्रवास?; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत याबाबतचे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं. या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटले. गृहमंत्री देशमुखांवर केलेल्या या आरोपाचा वाद काही संपण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत. गृहमंत्री देशमुख यांचे एक तिकीट सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे देशमुख १५ फेब्रुवारीला एका खासगी विमानाने मुंबईला आले होते, यावर चर्चांना उधाण आले आहे. 

आता स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडिओ ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. देशमुख म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांमध्ये माझ्याबद्दल बरीच चुकीची माहिती पसरत चालल्याचे दिसत आहे. आपणा सर्वांना ठाऊकच आहे की, गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात मी राज्यभर फिरलो, राज्याच्या विविध भागातील पोलिसांना भेटलो आणि त्यांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहन दिले. दरम्यान, ५ फेब्रुवारीला माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, त्यामुळे मी ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हॉस्पिटलमध्ये होतो.

ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू​

ते पुढे म्हणाले की, १५ फेब्रुवारीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी पुढील १० दिवस होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे १५ फेब्रुवारीलाच मी खासगी विमानाने मुंबईला आलो होतो. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी रात्री उद्यानात प्राणायाम करण्यासाठी जात होतो. 

'नागपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना तसेच होम क्वॉरंटाईन दरम्यान मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही मीटिंग्स आणि कार्यक्रमांना हजेरी लावली होती. होम क्वॉरंटाईननंतर १ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार होते. यासाठी प्रश्न-उत्तरांची माहिती देण्यासाठी काही अधिकारी माझ्या घरी येत होते. शासकीय कामानिमित्त मी २८ फेब्रुवारीला घराबाहेर पडलो होतो, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं. 

शिवसेना महिलांना धमकावण्याचं काम करत नाही : खासदार सावंत​​

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. मुंबईत रिकव्हरी रॅकेट चालवण्याच्या आरोप देशमुख यांच्यावर करण्यात आले. याचे अनेक तर्क आणि पुरावे पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिले आहेत. गृहमंत्री देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली रॅकेट चालविण्याचा आरोप केला जात आहे, त्यावेळी ते आजारी होते तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.  

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)