शिवसेना महिलांना धमकावण्याचं काम करत नाही : खासदार सावंत​

Navneet_Rana_Arvind_Sawant
Navneet_Rana_Arvind_Sawant

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. सचिन वाझे प्रकरण आणि  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद संसदेत उमटले. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप केला. खासदार राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रद्वारे लेखी तक्रार दिली आहे. संसदेत सचिन वझे यांचं प्रकरण उचलून धरल्याने नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली. 'महाराष्ट्रात तू कशी फिरते ते बघतोच. तुला तुरुंगात डांबू,' अशी धमकी शिवेसना खासदार सावंत यांनी दिल्याचे नवनीत राणांनी पत्रात नमूद केलं आहे. 

नवनीत राणांचे हे आरोप सावंत यांनी फेटाळून लावले आहेत. मी त्यांना धमकी का देऊ? त्यावेळी तिच्याजवळ जे कोणी लोक असतील, त्यांनी मी तिला धमकी दिली का हे सांगू शकतात. शिवसेना महिलांना धमकावण्याचं काम करत नाही, असं सावंत यांनी स्पष्ट केले.

खासदार सावंत पुढे म्हणाले की, 'नवनीत राणा यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे. जेव्हा त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेतात, तेव्हा त्यांच्या देहबोलीतून त्या तिरस्कार करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आजही त्या तशाच बोलत होत्या. तरीही आम्ही काही बोललो नाही. मी त्यांची बोलण्याची पद्धत योग्य नाही एवढंच म्हणालो, कोणतीही धमकी दिली नाही.'   

खासदार नवनीत राणा यांना धमकी दिली, पण धमकी नक्की कोणी दिली हे बघता आलं नाही, असं वायएसआरसीपीच्या खासदारांनी म्हटलं आहे. तसेच नवनीत राणा या माझ्याशी याविषयी बोलल्या आहेत. खासदार अरविंद सावंत यांनी असं बोलणं चुकीचं आहे. सभापतींनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी भाजप खासदार रमा देवी यांनी केली आहे. 

दरम्यान, मुंबईतील मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राचे सध्या राज्यभरात पडसाद उमटत आहेत. खासदार नवनीत राणांनी हे प्रकरण संसदेत उचलून धरल्याने सावंत यांनी त्यांना संसदेच्या लॉबीमध्ये धमकी दिली. याआधीही त्यांना धमक्यांचे फोन आले होते. अॅसिड हल्ला तसेच जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती, असंही राणा यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. सावंत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. 

 - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com