esakal | ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

MP_Accident

बस ग्वाल्हेरपासून मुरैनाकडे जात होती. दोन ऑटोरिक्षांमधून महिला प्रवास करत होत्या.

ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी (ता.२३) एक भीषण अपघात झाला. पुरानी छावनी परिसरात बस आणि रिक्षाचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ महिला आणि एका ऑटो रिक्षा चालकाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. १३ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. 

गांधी शांतता पुरस्कार - बांगलादेशचे बंगबंधू आणि ओमानच्या सुलतानांचा गौरव​

मिळालेल्या माहितीनुसार, बस आणि रिक्षा यांचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील १२ महिला आणि ऑटो रिक्षाचालक यांचा मृतांमध्ये समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी दिली आहे. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी रिक्षातील मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवून दिले असून अपघात कसा झाला, याचा तपास घेतला जात आहे. 

बस ग्वाल्हेरपासून मुरैनाकडे जात होती. दोन ऑटोरिक्षांमधून महिला प्रवास करत होत्या. पण एका रिक्षामध्ये बिघाड झाल्याने या सर्व महिला एकाच रिक्षाने निघाल्या होत्या. या १२ महिलांवर काळाने झडप घातली. 

थरकाप उडवणारा व्हिडिओ : कबड्डी स्पर्धेवेळी गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जखमी​

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या दु:खद प्रसंगी आम्ही मृतांच्या परिवारासोबत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. आणि त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना चौहान यांनी केली आहे. तसेच चौहान यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये मदतनिधी जाहीर केला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image