गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून हुतात्मा काळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

दुपारी बाराच्या सुमारास गृहमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा पानगाव येथे दाखल झाला. सुरुवातीला श्री देशमुख यांच्यासह  त्यांच्या सहकाऱ्यांनी हुतात्मा काळे यांना आदरांजली वाहिली. आदरांजलीनंतर हुतात्मा काळे यांच्या भाचीने त्यांच्या कुटुंबाची सद्यस्थिती गृहमंत्र्यापुढे मांडून महाराष्ट्र शासनाने हुतात्मा कुटुंबियांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली.

पानगाव (सोलापूर): पुलवामा येथे हुतात्मा झालेले पानगाव ता.बार्शी येथील सी.आर.पी.एफचे जवान सुनील काळे यांच्या कुटुंबियांची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत आणि राज्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

दुपारी बाराच्या सुमारास गृहमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा पानगाव येथे दाखल झाला. सुरुवातीला श्री देशमुख यांच्यासह  त्यांच्या सहकाऱ्यांनी हुतात्मा काळे यांना आदरांजली वाहिली. आदरांजलीनंतर हुतात्मा काळे यांच्या भाचीने त्यांच्या कुटुंबाची सद्यस्थिती गृहमंत्र्यापुढे मांडून महाराष्ट्र शासनाने हुतात्मा कुटुंबियांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. शेवटी गृहमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत आम्ही सार्वजण हुतात्मा काळे यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी मंत्री दिलीप सोपल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister and Health Minister present to offer condolences to the family of Hutatma Kale