पेपरफुटीप्रकरण २०१७-१८ पासून सुरूय; गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

पेपरफुटीप्रकरण २०१७-१८ पासून सुरूय; गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज विधानसभेत बोलताना आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी माहिती दिली. गृहमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही, राज्य सरकारने पेपरफुटीच्या संदर्भात अंत्यंत कठोर भूमिका घेतली असून आतापर्यंत २० आरोपींना अटक केली असल्याचे ते म्हणाले.

वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकून पाच गुन्हे दाखल केलेत, आरोग्य विभागाच्या ड विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल केला आणि २० आरोपींना अटक केली आहे, तर अजून १० आरोपी अटक व्हायचे राहीले आहेत. ज्या परिक्षार्थिंना पेपर मिळाले त्याची चौकशी करणं देखील बाकी असल्याचे त्यांनी सांगितलं.

तर आरोग्य विभागाची क वर्गाच्या भरती प्रक्रीयेत पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ११ अरोपी अटक केलेत तर ९ आरोपींचा शोध सुरु आहे. म्हाडाच्या भरती प्रक्रियेत परीक्षा झाली नाही. त्याच्यामध्ये ज्या बाबी समोर आल्या त्यासाठी देखील गुन्हा दाखल केला, त्यामध्ये ६ आरोपींना अटक केली आहे तर १६ आरोपींना अटक करणे बाकी आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिलीय.

हेही वाचा: "माझ्या वडिलांना दोन वर्ष इंदिराजींनी जेलमध्ये ठेवलं होतं, त्यामुळं…"

टिईटीच्या संदर्भामध्य सुध्दा जी चौकशी झाली त्यामध्ये देखील गुन्हा दाखल झाला त्यामध्ये चौदा आरोपींना अटक केली आहे. या संदर्भातली ही जीए सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक रितेश देशमुख यांच्या कडे तपास चालू असताना त्यांच्याकडे २०१९ मध्ये शिक्षक पात्रता प्रमाणपत्र वाटपावरुन ७८८० अपात्र परिक्षार्थींना पात्र केले, त्यांच्याकडून सुमारे ४ कोटी २० लाख जमा करुन घेतले.

या प्रकरणाच्या तपासामध्ये दुसरी गंभीर बाब पुढे आल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले, गृहमंत्र्यांनी म्हणाले की, या तपासामध्ये 'आम्ही २०१-१८ पासून आम्ही हे सगळं करतोय' अशी माहिती आरोपींनी दिल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, यामध्ये कोणाचा दोष आहे, मला माहिती नाही परंतु या कंपन्या नियुक्त करत असताना या पुढच्या काळामध्ये अधिक पारदर्शक पध्दत कशी राबवायची यासाठीचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: स्वस्तात मस्त Renault Kwid भारतात लाँच; फक्त 'इतकी' असेल किंमत

Web Title: Home Minister Dilip Walse Patil On Paper Leak Case Maharashtra Budget Session 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dilip Walse Patil
go to top