मशिदींवरील भोंग्यासंदर्भात वळसे पाटलांचं मोठं विधान

मशिदींवरील भोंग्याच्या बाबतीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSakal

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यावरून महाराष्ट्रात वातावरण चांगलंय तापलं आहे. मशिदींवरील भोंगे काढून टाकावेत अशी भूमिका काही पक्षांनी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत सरकारला अल्टीमेटमही दिला. महाराष्ट्रातील ही परिस्थिती पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

"लाऊडस्पीकरला परवानगी असलेल्या डेसिबल मर्यादेत परवानगी द्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणी त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल", असं महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. 9Home Minister Dilip Walse Patil's big statement regarding laudspeaker on Masjid)

Dilip Walse Patil
मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद करा ः मनसे

रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवू नयेत, असे न्यायालयाने सांगितले. ज्या मशिदी किंवा मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे, त्यामधील लाऊडस्पीकर काढण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेने कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com