‘पतंजली’च्या कोरोनिलवर राज्यात बंदी - देशमुख 

anil-deshmukh
anil-deshmukh

मुंबई - योगगुरू बाबा रामदेव यांनी गाजावाजा करत कोरोनावर बाजारात आणलेल्या औषधाला राज्यात विकण्यास परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ने दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा करीत कोरोनावर ‘कोरोनिल’हे औषध पत्रकार परिषद घेऊन बाजारात आणले होते. मात्र, पतंजलीच्या या औषधाच्या विक्रीवर केंद्र सरकारने निर्बंध घातल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती ट्विट करून दिली. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रामदेव बाबांना मोठा झटका बसला आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाची क्लिनिकल ट्रायल करण्यात आली की नाही, याचा शोध घेणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट केले आहे. ‘आयुष’ मंत्रालयानेही बाबा रामदेव यांच्या या औषधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या औषधाच्या जाहिरातीवरही बंदी घातली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com