Thirty First Party RulesESakal
महाराष्ट्र बातम्या
Thirty First Rules: हॉटेल्स सकाळी ५ पर्यंत खुले राहणार, पण 4 पेगपेक्षा जास्त नाही मिळणार, थर्टी फस्टसाठीची नियमावली
Thirty First Party Rules: हॉटेल्स सकाळी ५ पर्यंत खुले राहणार आहे. पण मद्यप्रमींना 4 पेगपेक्षा जास्त नाही मिळणार नाहीत. नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
लोकांनी आतापासूनच नवीन वर्ष साजरे करण्याचे नियोजन सुरू केले आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या पार्टीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. काही लोक आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत घरीच साजरे करतील, तर अनेकजण हॉटेल किंवा रिसॉर्ट्समध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्याची योजना आखत आहेत. हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधील पार्ट्यांमध्ये जाम पसरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रात नववर्ष साजरे करण्यासंदर्भात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.