
'या' तारखेपासून हॉटेल-नाट्यगृहं होणार पूर्ण क्षमतेने सुरु : टोपे
मुंबई : देशासह राज्यातील सात्यत्याने कमी होणाऱ्या कोरोना रूग्णसंख्येमुळे नागरिकांसह प्रशासनाने मोकळा श्वास घेतला आहे. या दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठे विधान केले असून, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सिनेमागृह, हॉटेल बार रेस्टॉरंट तसेच नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकतात अशी माहिती दिली आहे. (Hotel & Theaters Will Reopen in Maharashtra)
हेही वाचा: धक्कादायक! कोरोनाकाळात 25 हजारांहून अधिक भारतीयांची आत्महत्या; NCBR चा अहवाल
ते म्हणाले की, राज्यातील कमी होणारी कोरोना रूग्णसंख्या नक्कीच दिलासादायक असून, याच पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृह तसेच हॉटेल बार रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा राज्य सरकारचा कल असल्याचे ते म्हणले. सध्या हॉटेल, नाट्यगृहे आणि सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, टोपे यांच्या या विधानामुळे राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Web Title: Hotel Theaters Run With Full Capacity Till Monthend In Maharashtra Says Rajesh Tope
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..