राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पाच ऑक्‍टोबरपासून 50 टक्के क्षमतेत होणार सुरु

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

लॉकडाऊनमुळे अक्षरक्षः कंबरडे मोडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना आता काहीशी उभारी मिळणार आहे. येत्या पाच ऑक्‍टोबरपासून राज्यातील सर्वच हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे खवय्ये पुणेकरांना आता स्टार्टरपासून स्वीट डिशची चव हॉटेलात बसून चाखता येणार आहे.

पुणे - लॉकडाऊनमुळे अक्षरक्षः कंबरडे मोडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना आता काहीशी उभारी मिळणार आहे. येत्या पाच ऑक्‍टोबरपासून राज्यातील सर्वच हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे खवय्ये पुणेकरांना आता स्टार्टरपासून स्वीट डिशची चव हॉटेलात बसून चाखता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॉटेल सुरू करण्याच्या निर्णयाचा शहरातील आठ हजार व्यावसायिकांना फायदा होणार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जून महिन्यापर्यंत शहरातील सर्वच हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पूर्णतः बंद होते. परवानगी मिळाल्यानंतर 10 ते 15 टक्के व्यावसायिकांनी पार्सल सेवा सुरू केली आहे.

पुण्याच्या आरोग्य प्रमुखपदी डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती

मात्र त्यास केवळ 10 टक्के प्रतिसाद आहे. त्यातून हॉटेलचा दैनंदिन खर्चही भागविणे मुश्‍कील होत आहे, असे हॉटेल चालक सांगतात. भाड्याच्या जागेत हॉटेल असलेल्या काहींनी या काळात गाशा गुंडाळला आहे. तर ज्यांचे भाडे माफ केले किंवा कमी केले, असे व्यावसायिक हॉटेल पूर्णतः सुरू होण्याची वाट पाहत होते. या सर्वांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू असताना कर्मचाऱ्यांनी काम बंद पाडले

कामगार येणार का?
पार्सल सुरू केलेल्या हॉटेलांमधील काही कर्मचारी सध्या कामावर हजर आहेत. मात्र अजूनही अनेक कामगार गावी आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहेत. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ वाढली तर आपल्यालाही कोरोना होईल, अशी भीती कामगारांच्या मनात आहे. त्यामुळे ते वेळेत परत येणार का? त्यांना पूर्ण पगार देता येईल का? असे प्रश्‍न व्यावसायिकांना पडले आहेत.

चारित्र्याचा संशय; नव्या नवरीने तीन महिन्यांतच केली आत्महत्या

पुरेसे ग्राहक येईनात -
एक सप्टेंबरपासून जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमावलीत रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाउस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र पुरेसे ग्राहकच येत नसल्याने परवानगी मिळून देखील त्याचा काही फायदा होत नसल्याचे मोठे हॉटेल चालक सांगतात.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotels restaurants and bars maharashtra state start operating 50 percent capacity October 5th