Ajit Pawar Vs Ekanth Shinde : तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे ? अजित पवारांचा थेट CM शिंदेंना सवाल

Ajit Pawar Vs Ekanth Shinde : वादाची ठिणगी पडताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मध्यस्थी
ajit pawar and Ekanth shinde
ajit pawar and Ekanth shindeesakal
Updated on

Ajit Pawar Vs Ekanth Shinde : ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये एका दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्लात घडलेल्या या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचे वृत्त 'साम' वृत्तवाहिनीने प्रकाशित केले आहे.

अधिक माहिती अशी की, ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये एका दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्लात घडलेल्या या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाब विचारण्याचे वृत्त 'साम' वृत्तवाहिनीने प्रकाशित केले आहे.

ajit pawar and Ekanth shinde
Mumbai News : भाजप-ठाकरे गट मुंबईत आमने-सामने; देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेनंतर दोन्ही पक्षांत ‘सामना’

या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यस्थी करून विषय थांबवल्याचे यावेळी वृत्तांत म्हटले आहे.

ajit pawar and Ekanth shinde
Gulab Nabi Azad : मी जे बोललो त्याचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला.. ; वादग्रस्त वक्तव्यावर आझादांनी दिले स्पष्टीकरण

शुक्रवारी मंत्र्यांची एक खाजगी बैठक पार पडली. यावेळी सर्वच मंत्री उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्न, योजना व निर्णयावर या ठिकाणी चर्चा झाली. यावेळी ठाण्यातील कळवा येथील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला.

ajit pawar and Ekanth shinde
Crime News : पत्रकाराच्या हत्येनंतर आणखी एका साक्षीदाराची हत्या; निवृत्त शिक्षकावर झाडल्या गोळ्या

मात्र एकनाथ शिंदे यांनी देखील रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण आदीची माहितीही शिंदे यांनी अजितदादांना दिली.

ajit pawar and Ekanth shinde
Narendra Modi : मोदींनी दिलेला शब्द पाळला ! हायड्रोजनवर चालणारी बस सेवा लवकरच होणार सुरु

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वाद वाढण्याची आणि बैठकीत शाब्दिक चकमक होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर फडणवीस यांनीच मध्यस्थी केली. आणि वेगळा विषय काढून ठाण्याच्या विषयाला बगल दिली. असे वृत्त साम ने प्रकाशित केले आहे.

ajit pawar and Ekanth shinde
CM Shinde : तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, नामांकित संस्था...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर काही मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. या शपथविधीनंतर या सरकारमध्ये सर्वच आलबेल असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे वृत्त 'साम' वृत्तवाहिनीने प्रकाशित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com