

6th January History: 6 जानेवारी 1664 हा दिवस मराठा इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्याला आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का देणारा पराक्रम केला. सुरतवर धाडसी हल्ला करून भरमसाठ संपत्ती हस्तगत केली. या घटनेने मोगल बादशहा औरंगजेबाला प्रचंड धक्का बसला आणि मराठ्यांच्या ताकदीची जाणीव पुन्हा एकदा झाली.