esakal | पावसाळ्यात विजांपासून कसं करायचं संरक्षण? आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केल्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

lightening

पावसाळ्यात विजांपासून कसं करायचं संरक्षण? आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केल्या सूचना

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : सध्या पाऊसाळा सुरू झाला आहे. काळेकुट्ट ढग आणि पावसाचं वातावरण तयार झालं की विजांचा कडकडाट (lightening) होतो. तसेच हा पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकरी पूर्ण दिवस शेतात असतात. तसेच अनेक नागरिक बाहेर फिरत असतात. मग, अशावेळी विजांचा कडकडाट सुरू झाला, तर अनेक दुर्घटना देखील घडतात. विजांमुळे स्वतःचा बचाव कसा करायचा? (how to save life from lightening) याबाबत आपत्ती व्यवस्थापनाने अतिशय सुंदर व्हिडिओ तयार केला आहे. कशी काळजी घ्यायची? याबाबत यामध्ये सूचना दिल्या आहेत. (how to save life from lightening in rainy season)

हेही वाचा: तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

एका शेतामध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, काळेकुट्ट ढग असं पावसाचं वातावरण तयार झालं आहे. इतक्या जोरजोरात विजा कडडातात. त्यानंतर लहान मुले कानाला हात लावून आणि पायांच्या टाचा जुळवून उभे आहेत त्याचठिकाणी खाली बसतात. मात्र, श्यामलाल नावाचे शेतकरी हे झाडाकडे धाव घेत मुलांना तुम्ही काय करता? असे विचारतात. त्यावेळी मुलं त्यांना विजांपासून कसं संरक्षण करायचं याचे धडे देतात. झाडांखाली उभे राहिले, तर विज पडून जखमी होऊ शकता, प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो, असे हे मुलं त्या शेतकऱ्याला सांगतात. पण, आश्रय घेण्यासाठी पक्की जागा मिळाली नाहीतर काय करायचं? असाही प्रश्न तो शेतकरी विचारतो. जागा मिळालीच नाहीतर कानावर हात ठेवत खाली बसावे. मात्र, यावेळी पायांच्या टाचा जुळलेल्या असाव्या याची खबरदारी घ्यावी, असा संदेश या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे.

विजेचा धोका हा उंच झाडे, वीजेचे खांब, वीजेच तार आणि पाण्यामध्ये अधिक असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून दूर राहा, असा संदेश या व्हिडिओमधून देण्यात आला आहे.

आणखी काय काळजी घ्यायची?

  • पावसाचं वातावरण तयार झालं असेल तर घराबाहेर पडणे टाळा.

  • शेतकऱ्यांना घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, विजांचा कडकडाट सुरू झाला असेल तर झाडांचा आश्रय घेऊ नका. पक्के घर असेल तर त्या घरात राहा. पण, घरात शिरल्यानंतर इलेक्ट्रीकचे उपकरण हाताळू नका. दारे-खिडक्यांपासून दूर राहा.

  • हातात छत्री असेल तर बंद करून दूर फेकून द्या.

  • खुल्या मैदानात झाडांपासून दूर उभे राहा. तसेच खुल्या जागेतच कानावर हात ठेवून खाली बसा.

  • एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती तुमच्यापासून दूर फेकून द्या किंवा दूर ठेवून द्या. लोखंडाकडे किंवा तांब्याकडे वीज लगेच (अ‍ॅट्रॅक्ट) आकृष्ट होते.